About us

आमच्याबद्दल

नवीन मराठी उद्योजक तयार करणार!

केंद्र आणि महाराष्ट्र शासन धोरणातर्गत "उद्योग कर उद्योग"

ह्या संकल्पनेच्या आधारित ह्या प्लॅटफॉर्म मधून तुम्हाला मिळणार:

विना व्याज व्यवसाय भांडवल

विनंती तारण नाही

विना जामीनदार

नवीन मराठी उद्योजक तयार करणार!

मराठी तरुणाई आणि व्यवसाय हे एक कधीही न जुळणारे समीकरण आहे असे अनेकांचे मत आहे. परंतु, या समीकरणाला दुजोरा देत मुंबई व्यापारी असोसिएशन अध्यक्ष श्री. अनिल फोंडेकर आणि महिला अध्यक्ष सौं. प्रज्ञा मोहिते आम्ही दोघे मराठी तरुणांना उद्योग क्षेत्राकडे वळविण्यासाठी नेहमीच कार्यरत असतो.

आम्ही काय करतो

मुंबई व्यापारी असोसिएशन ही स्थानिक व्यापाऱ्यांना संघटित करणे, त्यांच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवणे, नवीन उद्योजकांना मदत करणे (जसे की भांडवल मिळवून देणे) आणि संघटनेच्या ध्येयांनुसार शहरात व्यापार वृद्धीसाठी स्थानिक स्तरावर कार्यक्रम राबवणे हे असते, जेणेकरून सर्व व्यापाऱ्यांच्या हिताचे रक्षण होईल आणि व्यवसायांना पाठिंबा मिळेल.

आमचे उत्तरदायित्व

मुंबई व्यापारी असोसिएशनचे मुख्य कार्य

सदस्य भरती आणि संघटन

शहरामधील सर्व व्यापारी, दुकानदार आणि उद्योजकांना संघटनेत सामील करून घेणे आणि त्यांना एकत्र आणणे।

स्थानिक समस्यांचे निराकरण

शहरातील व्यापाऱ्यांच्या समस्या (परवाने, कर, कायदा-सुव्यवस्था) समजून घेणे आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी संघटना आणि प्रशासनासोबत काम करणे।

शासकीय धोरणांची अंमलबजावणी

केंद्र व राज्य शासनाच्या व्यापार-संबंधी धोरणांची माहिती स्थानिक व्यापाऱ्यांना देणे आणि त्यांच्या अंमलबजावणीत मदत करणे।

नवीन उद्योजकांना प्रोत्साहन

नवीन उद्योजक तयार करण्यासाठी मार्गदर्शन करणे, त्यांना विना-तारण कर्ज, भांडवल आणि इतर आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे।

नेटवर्किंग आणि मार्गदर्शन

स्थानिक स्तरावर नेटवर्किंग कार्यक्रम आयोजित करणे, उद्योजकांना प्रशिक्षण देणे आणि व्यवसायाच्या वाढीसाठी मार्गदर्शन करणे।

सामूहिक आवाज बनणे

व्यापाऱ्यांच्या हितासाठी स्थानिक प्रशासनासमोर किंवा सरकारी पातळीवर एक सामूहिक आवाज म्हणून प्रतिनिधित्व करणे।

व्यापारी हिताची माहितीचे आदान-प्रदान

बाजारपेठेतील नवीन संधी, सरकारी योजना आणि उद्योग-विशिष्ट माहिती व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचवणे।

आमचे उपक्रम

आम्ही मुंबई व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून विविध ठिकाणी franchise आणि distributors उद्योग मेळावे सुद्धा आयोजित करण्यात आले आहेत आणि यशस्वीरीत्या पार पडले.

सरकारी समर्थन कार्यक्रम

या उपक्रमाचा एकमेव उद्देश म्हणजे महाराष्ट्रातील मराठी उद्योजकांनी नवीन मराठी उद्योजक तयार करावे. शिवाय याला केंद्र आणि महाराष्ट्र शासन अनुदान योजना आहेतच उदा.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना
पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना
स्टॅन्ड अप इंडिया
मुद्रा लोन
व्याज परतवा
बीज भांडवल

या व्यवसायांना विविध राष्ट्रीयकृत बँकानी या विना तारण 50 लाख पर्यंत कर्ज द्यायला तयार आहेत.

पण यासाठी तुम्हाला कोणीतरी पुढे करण्यासाठी, तुमची मानसिकता, तुमची हिंमत वाढवण्याकरिता गेले कित्येक वर्ष आम्ही काम करत आहोत. म्हणू तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी तुमच्यासाठी असलेले महाराष्ट्रातील उद्योगांचे विविध पॅकेज देण्याकरिता आवाहन करत आहोत की, ज्यांचे स्वतःच्या मेहेनतीचे, कल्पकतेचे विविध क्षेत्रातील प्रोडक्ट्स असतील त्यांनी या वेबसाईट वर स्वतःचे प्रॉडक्ट्स नोंदविण्याकरिता आवाहन करतो शिवाय ज्यांना स्टार्ट अप प्रकल्प उभारायचा आहे त्यांच्या मागे आम्ही आहोत.

आम्ही महाराष्ट्रतील तमाम स्थानिक मराठी तरुण तरुणीना आवाहन करत आहोत कि तुम्ही दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा व्यवसाय करून स्वकष्टाची भाकरी कमवा तरच तुम्ही तुमच्या करियरचे तुमच्या शिल्पकार व्हाल.

"मीं करेन उद्योग, मीं होईन उद्योजक" हे ध्येय उराशी बाळगून तुम्ही ह्या व्यवसाय करण्याच्या उंबरठ्यावर उभे रहा.

धन्यवाद

अनिल फोंडेकर

प्रज्ञा मोहिते

संस्थापक

मुंबई व्यापारी असोसिएशन

आमचे मूल मूल्य

एकता

व्यवसायांना एकत्र करून शक्ती निर्माण करणे

वृद्धी

आर्थिक विकास आणि विस्तार प्रोत्साहित करणे

उत्कृष्टता

सेवेमध्ये सर्वोच्च मानदंड टिकवून ठेवणे

समुदाय

परस्पर सफलतासाठी एकमेकांना समर्थन देणे